YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Deuteronomy 6:1-9

अनुवाद 6:1-9 - तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हांला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे : तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत.
त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्रपौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्यात म्हणजे तू दीर्घायू होशील.
म्हणून, हे इस्राएला, श्रवण कर, आणि त्या काळजीपूर्वक पाळ म्हणजे तुझे कल्याण होईल; आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील.
हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;
तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.
ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव;
आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.
त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव.
आपल्या दाराच्या चौकटींवर व आपल्या फाटकांवर त्या लिही.

तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हांला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे : तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत. त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्रपौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्यात म्हणजे तू दीर्घायू होशील. म्हणून, हे इस्राएला, श्रवण कर, आणि त्या काळजीपूर्वक पाळ म्हणजे तुझे कल्याण होईल; आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील. हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या चौकटींवर व आपल्या फाटकांवर त्या लिही.

अनुवाद 6:1-9

Deuteronomy 6:1-9