Colossians 1:27-29

ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो; अशासाठी की, प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. ह्याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे.
कलस्सै 1:27-29