YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 Corinthians 9:1-9

२ करिंथ 9:1-9 - तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही;
कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे; तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने म्हणत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली; आणि ह्या तुमच्या आस्थेने त्यांच्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.
तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवत आहे, ते अशासाठी की, मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे;
नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांना दिसून आले, तर त्या भरवशाबाबत आमची — तुमची म्हणत नाही — फजिती होईल.
म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी; मात्र ती कृपणतेने न देता उदार अंत:करणाने द्यावी; म्हणून तुमच्याकडे आगाऊ जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले.

हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.
प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.
सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.
“तो चहूकडे वाटप करीत असतो;
दरिद्र्यांस दानधर्म करीत असतो;
त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते,”
असे शास्त्रात लिहिले आहे.

तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही; कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे; तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने म्हणत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली; आणि ह्या तुमच्या आस्थेने त्यांच्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे. तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवत आहे, ते अशासाठी की, मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे; नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांना दिसून आले, तर त्या भरवशाबाबत आमची — तुमची म्हणत नाही — फजिती होईल. म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी; मात्र ती कृपणतेने न देता उदार अंत:करणाने द्यावी; म्हणून तुमच्याकडे आगाऊ जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे. “तो चहूकडे वाटप करीत असतो; दरिद्र्यांस दानधर्म करीत असतो; त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते,” असे शास्त्रात लिहिले आहे.

२ करिंथ 9:1-9

2 Corinthians 9:1-9