2 Corinthians 1:3-7

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दु:खे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आमच्यावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते; आणि आम्हांला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दु:खे आम्ही सोसतो, ती सहन करण्यास तुम्हांला सामर्थ्य मिळते. तुमच्याविषयीची आमची आशा दृढ आहे; कारण आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दु:खाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचेही सहभागी आहात.
२ करिंथ 1:3-7