1 Timothy 2:1-4

तर सर्वांत प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी; राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकार्यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.
1 तीमथ्य 2:1-4