1 Peter 5:8-14

सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दु:खे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील. त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहवून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलातील तुमच्यासारखी निवडलेली मंडळी तुम्हांला सलाम सांगते; आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.
1 पेत्र 5:8-14