YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 Peter 1:13-17

1 पेत्र 1:13-17 - म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणार्‍या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.
तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका;
तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा;
कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”
जो तोंडदेखला न्याय करत नाही, तर ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही ‘पिता म्हणून हाक मारता,’ तर आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा.
1 Peter 1:13-17