1 John 5:13-17

देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणार्या तुम्हांला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी हे तुम्हांला लिहिले आहे. (आणि तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवीत राहावे). त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल; आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल; अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे; आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. सर्व प्रकारची अनीती पापच आहे; तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे.
1 योहान 5:13-17