1 Corinthians 3:18-23

कोणी स्वत:ला फसवून घेऊ नये; ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे; कारण “तो ज्ञान्यांस त्यांच्याच धूर्तपणात धरतो,” असा शास्त्रलेख आहे. आणि “ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो,” असा दुसरा शास्त्रलेख आहे. म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्वकाही तुमचे आहे; पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.
१ करिंथ 3:18-23