1 Korintským 3:16-20

तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील; कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. कोणी स्वत:ला फसवून घेऊ नये; ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे; कारण “तो ज्ञान्यांस त्यांच्याच धूर्तपणात धरतो,” असा शास्त्रलेख आहे. आणि “ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो,” असा दुसरा शास्त्रलेख आहे.
१ करिंथ 3:16-20