1 Corinthians 16:13-18

सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा; खंबीर व्हा. तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करा. बंधुजनहो, तुम्हांला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे; ते अखयाचे प्रथमफळ आहे, आणि त्यांनी आपणांस पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे. अशांना, आणि जो कोणी सेवेत साहाय्य करतो व श्रम करतो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हांला विनंती करतो. स्तेफना, फर्तूनात व अखायिक हे आल्याने मला आनंद झाला आहे; कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे. कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यांना हुरूप आणला आहे; म्हणून तुम्ही अशांना मान द्या.
१ करिंथ 16:13-18