YouVersion लोगो
सर्च आयकॉन

I Corinthians 1:18-24

१ करिंथ 1:18-24 - कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे.
“कारण मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन,
व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” असा शास्त्रलेख आहे.
‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही?
कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही,1 तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणार्‍या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले.
कारण यहूदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात,
आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा,
परंतु पाचारण झालेल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे.

कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे. “कारण मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” असा शास्त्रलेख आहे. ‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही,1 तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणार्‍या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहूदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे.

१ करिंथ 1:18-24

I Corinthians 1:18-24