च्या शोधाचे निकाल: romans 6:23
रोमकरांस पत्र 6:23 (MARVBSI)
कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
अनुवाद 6:23 (MARVBSI)
आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात आम्हांला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हांला बाहेर काढले.
यहोशवा 6:23 (MARVBSI)
तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आईबापांना, भाऊबंदांना आणि तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले.
शास्ते 6:23 (MARVBSI)
परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे क्षेम असो; भिऊ नकोस, तू मरायचा नाहीस.”
ईयोब 6:23 (MARVBSI)
शत्रूंच्या हातून मला सोडवा; उपद्रव देणार्यांच्या काबूतून मला मुक्त करा,’ असे काही मी तुम्हांला म्हटले होते काय?
नीतिसूत्रे 6:23 (MARVBSI)
कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचे वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे;
यिर्मया 6:23 (MARVBSI)
ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.”
दानीएल 6:23 (MARVBSI)
तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, “दानिएलास गुहेतून बाहेर काढा.” त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता.
मत्तय 6:23 (MARVBSI)
पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल; ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा!
मार्क 6:23 (MARVBSI)
तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”
लूक 6:23 (MARVBSI)
त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करत असत.
योहान 6:23 (MARVBSI)
तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते.
निर्गम 6:23 (MARVBSI)
अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलीशेबा बायको केली; तिच्यापासून त्याला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले.
लेवीय 6:23 (MARVBSI)
याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा; ते खाऊ नये.”
गणना 6:23 (MARVBSI)
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना असे सांग की, तुम्ही इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना ह्याप्रमाणे म्हणा :
इफिसकरांस पत्र 6:23 (MARVBSI)
देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो.
२ शमुवेल 6:23 (MARVBSI)
शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही.
१ राजे 6:23 (MARVBSI)
जैतून लाकडाचे दहा-दहा हात उंच असे दोन करूब करून त्याने गाभार्यात ठेवले.
२ राजे 6:23 (MARVBSI)
मग त्याने त्यांना मोठी मेजवानी दिली; त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर त्याने त्यांना निरोप दिला; आणि ते आपल्या धन्याकडे गेले. अरामी लोकांच्या टोळ्या इस्राएल देशावर पुन्हा आल्या नाहीत.
१ इतिहास 6:23 (MARVBSI)
त्याचा पुत्र एलकाना, त्याचा पुत्र एब्यासाफ, त्याचा पुत्र अस्सीर;
२ इतिहास 6:23 (MARVBSI)
तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर; त्याप्रमाणे घडवून आण; आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टाची कृती त्याच्या शिरी उलटेल असे त्याचे पारिपत्य कर; निर्दोष्यास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला फळ दे.
अनुवाद 23:6 (MARVBSI)
तू आपल्या हयातीत त्याचे क्षेमकुशल कधीही चिंतू नकोस.
यहोशवा 23:6 (MARVBSI)
म्हणून मोठी हिंमत धरा, मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथांत जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा, त्यापासून उजवीडावीकडे वळू नका;
ईयोब 23:6 (MARVBSI)
त्याने आपले मोठे बल खर्चून बरोबर वाद केला असता काय? नाही; तर त्याने माझी दाद घेतली असती.
स्तोत्रसंहिता 23:6 (MARVBSI)
खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील; आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.