च्या शोधाचे निकाल: christ is coming soon
1 थेस्सल 4:16 (MARVBSI)
कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील.
प्रेषितांची कृत्ये 1:11 (MARVBSI)
ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल.”
प्रकटी 22:20 (MARVBSI)
ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये, प्रभू येशू, ये.
प्रकटी 1:7 (MARVBSI)
‘पाहा, तो मेघांसहित येतो;’ प्रत्येक डोळा त्याला ‘पाहील’, ज्यांनी त्याला ‘भोसकले तेही पाहतील; आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील.’ असेच होणार. आमेन.
योहान 14:3 (MARVBSI)
आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
मत्तय 24:44 (MARVBSI)
म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.
मार्क 13:32 (MARVBSI)
आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे.
१ करिंथ 15:52 (MARVBSI)
क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ.
1 थेस्सल 5:2 (MARVBSI)
कारण तुम्हा स्वत:ला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.
2 पेत्र 3:10 (MARVBSI)
तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1
प्रकटी 1:8 (MARVBSI)
‘प्रभू देव जो आहे,’ जो होता व जो येणार, ‘जो सर्वसमर्थ,’ तो म्हणतो, “मी अल्फा व ओमेगा आहे.”2
प्रकटी 22:7 (MARVBSI)
‘पाहा, मी लवकर येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य.
प्रकटी 22:12 (MARVBSI)
“‘पाहा, मी’ लवकर1 ‘येतो;’ आणि प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे.’
प्रकटी 3:11 (MARVBSI)
मी लवकर येतो; तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा.
प्रकटी 22:21 (MARVBSI)
प्रभू येशूची कृपा सर्व4 जनांबरोबर असो. आमेन.