च्या शोधाचे निकाल: Rev. 22:8-9
प्रकटी 22:1 (MARVBSI)
नंतर त्याने देवाच्या व कोकर्याच्या राजासनातून ‘निघालेली’ नगरीच्या मार्गावरून वाहणारी ‘जीवनाच्या पाण्याची’ स्फटिकासारखी नितळ ‘नदी’ मला दाखवली.
प्रकटी 22:2 (MARVBSI)
नदीच्या ‘दोन्ही बाजूंना’ बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते ‘दर महिन्यास आपली फळे’ देते आणि त्या झाडाची ‘पाने’ राष्ट्रांच्या ‘आरोग्यासाठी’ उपयोगी पडतात.
प्रकटी 22:3 (MARVBSI)
‘पुढे काहीही शापित असणार नाही;’ तर तिच्यामध्ये देवाचे व कोकर्याचे राजासन असेल; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील.
प्रकटी 22:4 (MARVBSI)
‘ते त्याचे मुख पाहतील’ व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल.
प्रकटी 22:5 (MARVBSI)
पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा ‘सूर्याच्या प्रकाशाची’ गरज नाही; कारण प्रभू देव त्यांच्यावर ‘प्रकाश पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’
प्रकटी 22:6 (MARVBSI)
नंतर तो मला म्हणाला, “ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत; आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा2 देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर ‘घडून आल्या पाहिजेत’ त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहे.
प्रकटी 22:7 (MARVBSI)
‘पाहा, मी लवकर येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य.
प्रकटी 22:8 (MARVBSI)
हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणार्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो;
प्रकटी 22:9 (MARVBSI)
परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.”
प्रकटी 22:10 (MARVBSI)
पुन्हा तो मला म्हणाला, “ह्या ‘पुस्तकातील’ संदेशवचने ‘शिक्का मारून बंद करू नकोस;’ कारण ‘वेळ’ जवळ आली आहे.
प्रकटी 22:11 (MARVBSI)
दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो; नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”
प्रकटी 22:12 (MARVBSI)
“‘पाहा, मी’ लवकर1 ‘येतो;’ आणि प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे.’
प्रकटी 22:13 (MARVBSI)
‘मी’ अल्फा व ओमेगा म्हणजे ‘पहिला व शेवटला,’ आदी व अंत असा आहे.
प्रकटी 22:14 (MARVBSI)
आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’ अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’2 ते धन्य.
प्रकटी 22:15 (MARVBSI)
कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.
प्रकटी 22:16 (MARVBSI)
ह्या गोष्टींविषयी तुम्हांला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे.”
प्रकटी 22:17 (MARVBSI)
आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.
प्रकटी 22:18 (MARVBSI)
ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणार्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील;
प्रकटी 22:19 (MARVBSI)
‘आणि’ जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही ‘काढून टाकील’ त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.3
प्रकटी 22:20 (MARVBSI)
ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये, प्रभू येशू, ये.
प्रकटी 22:21 (MARVBSI)
प्रभू येशूची कृपा सर्व4 जनांबरोबर असो. आमेन.
प्रकटी 2:22 (MARVBSI)
पाहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणार्या लोकांना, तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चात्ताप न केल्यास, मोठ्या संकटात पाडीन.
प्रकटी 3:22 (MARVBSI)
आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.”
प्रकटी 18:22 (MARVBSI)
वीणा वाजवणारे, ‘गवई’, पावा वाजवणारे व कर्णा वाजवणारे ह्यांचा ‘नाद’ तुझ्यात ‘ह्यापुढे ऐकूच येणार नाही;’ कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणारच नाही; ‘आणि जात्याचा आवाज’ तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही;
प्रकटी 21:22 (MARVBSI)
त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते.