YouVersion लोगो
सर्च आयकॉन

च्या शोधाचे निकाल: Psaumes 33:6

अनुवाद 33:6 (MARVBSI)

‘रऊबेनाचे लोक मोजके असले तरी तो जिवंत राहो, मृत्यू न पावो.’

ईयोब 33:6 (MARVBSI)

पाहा, देवापुढे मी तुझ्यासारखाच आहे; मीही मातीच्या गोळ्याचा घडलेला आहे.

स्तोत्रसंहिता 33:6 (MARVBSI)

परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले.

यशया 33:6 (MARVBSI)

तुझ्या काळी स्थिरता वसेल; तारण, सुज्ञता व ज्ञान ह्यांचे वैपुल्य होईल; परमेश्वराचे भय त्याचा निधी होईल.

यिर्मया 33:6 (MARVBSI)

तर पाहा, मी ह्या नगरास आरोग्याचे उपचार करीन, त्या लोकांना बरे करीन, आणि शांती व सत्य ह्यांचे वैपुल्य त्यांच्या ठायी प्रकट करीन.

यहेज्केल 33:6 (MARVBSI)

पण जर पहारेकर्‍याने तलवार येताना पाहून शिंग वाजवले नाही व लोकांना सावध केले नाही आणि तलवारीने येऊन त्यांपैकी कोणास नेले तर तो आपल्या अधर्मानेच मरेल, तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकर्‍याजवळ मागेन.

उत्पत्ती 33:6 (MARVBSI)

तेव्हा त्या दासींनी मुलांसह जवळ येऊन त्याला नमन केले.

निर्गम 33:6 (MARVBSI)

ह्यामुळे होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागिन्यांवाचून राहिले. दर्शनमंडप

गणना 33:6 (MARVBSI)

सुक्कोथ येथून कूच करून रानाच्या कडेवरच्या एथामात त्यांनी तळ दिला.

२ इतिहास 33:6 (MARVBSI)

त्याने आपली मुले हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यात अग्नीत होम करून अर्पण केली; तो शकुनमुहूर्त मानत असे; जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.

मत्तय 6:33 (MARVBSI)

तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.

शास्ते 6:33 (MARVBSI)

नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देनेपलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोर्‍यात तळ दिला.

नीतिसूत्रे 6:33 (MARVBSI)

त्याला घाय व अपकीर्ती ही प्राप्त होतील; त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही.

मार्क 6:33 (MARVBSI)

लोकांनी त्यांना निघताना पाहिले व पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले; आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले व धावत जाऊन त्यांच्याअगोदर तिकडे पोहचले.

लूक 6:33 (MARVBSI)

जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात.

योहान 6:33 (MARVBSI)

कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय.”

१ राजे 6:33 (MARVBSI)

त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाची चौकट बनवली होती; तिने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता.

२ राजे 6:33 (MARVBSI)

तो त्यांच्याशी असे बोलत आहे इतक्यात जासूद त्याच्याकडे येऊन पोहचला. तो म्हणाला, “ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे तर ह्यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी?”

१ इतिहास 6:33 (MARVBSI)

तेथे हजर असत ते व त्यांचे पुत्र हे : कहाथी वंशापैकी गायक हेमान, बिन योएल, बिन शमुवेल,

२ इतिहास 6:33 (MARVBSI)

तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर; म्हणजे ह्या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाव ओळखून तुझ्या इस्राएल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यांना कळून येईल.