च्या शोधाचे निकाल: Jeremiah 29:11
यिर्मया 29:11 (MARVBSI)
परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.
अनुवाद 29:11 (MARVBSI)
तुमची मुलेबाळे, तुमच्या स्त्रिया व लाकूडतोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे आज ह्यासाठी उभे आहेत की,
ईयोब 29:11 (MARVBSI)
कोणाच्या कानी माझे वर्तमान गेले असता तो मला धन्य म्हणे; कोणाच्या दृष्टीस मी पडलो असता तो माझ्याविषयी ग्वाही देई;
स्तोत्रसंहिता 29:11 (MARVBSI)
परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल; परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल.
नीतिसूत्रे 29:11 (MARVBSI)
मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्त करतो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवतो.
यशया 29:11 (MARVBSI)
सगळा दृष्टान्त तुम्हांला मोहोरबंद केलेल्या लेखातील शब्दांसारखा झाला आहे; तो लेख वाचणार्याकडे देऊन म्हणतात, “एवढे वाचून दाखव,” तो म्हणतो, “हा मला वाचता येत नाही. कारण हा मोहोरबंद केलेला आहे,”
यहेज्केल 29:11 (MARVBSI)
मनुष्याचा पाय त्याला लागायचा नाही, पशूच्या पायाचा त्याला स्पर्श होणार नाही; चाळीस वर्षे त्यात कोणी वस्ती करणार नाही.
उत्पत्ती 29:11 (MARVBSI)
मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला.
निर्गम 29:11 (MARVBSI)
मग परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ तो गोर्हा वधावा.
गणना 29:11 (MARVBSI)
प्रायश्चित्ताचे पापार्पण, नित्य होमार्पण व त्याबरोबर त्याचे अन्नार्पण आणि त्यांबरोबरची पेयार्पणे ह्यांखेरीज पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.
१ शमुवेल 29:11 (MARVBSI)
दावीद व त्याचे लोक पहाटेस उठून पलिष्ट्यांच्या देशात परत गेले; इकडे पलिष्टी इज्रेलावर चढाई करून गेले.
१ इतिहास 29:11 (MARVBSI)
हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्वरा; राज्यही तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस.
२ इतिहास 29:11 (MARVBSI)
मुलांनो, आता हयगय करू नका, कारण तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहावे, त्याची सेवाचाकरी करावी व त्याचे सेवक होऊन धूप जाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हांला निवडले आहे.”
मत्तय 11:29 (MARVBSI)
मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’
इब्री 11:29 (MARVBSI)
जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले; मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले.
अनुवाद 11:29 (MARVBSI)
जो देश ताब्यात घ्यायला तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेऊन पोहचवील तेव्हा तू गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावास.
शास्ते 11:29 (MARVBSI)
मग इफ्ताहावर परमेश्वराचा आत्मा उतरला आणि इफ्ताह गिलाद व मनश्शे ह्या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पे येथे आला आणि गिलादी मिस्पे येथून कूच करून अम्मोनी लोकांवर चालून गेला.
नहेम्या 11:29 (MARVBSI)
एन्-रिम्मोनात, सारयात, यर्मूथात,
नीतिसूत्रे 11:29 (MARVBSI)
जो घरच्यांना दु:ख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल; मूर्ख मनुष्य शहाण्याचा चाकर होईल.
दानीएल 11:29 (MARVBSI)
नेमलेल्या वेळी तो पुन्हा दक्षिणेस जाईल; तरी पूर्वीप्रमाणे आता त्याचे चालणार नाही.
मार्क 11:29 (MARVBSI)
येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हांला सांगेन.
लूक 11:29 (MARVBSI)
तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असताना तो असे म्हणू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते; परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.
योहान 11:29 (MARVBSI)
हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली.
उत्पत्ती 11:29 (MARVBSI)
अब्राम व नाहोर ह्यांनी बायका केल्या; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का; मिल्का ही हारानाची कन्या; हा हारान मिल्का व इस्का ह्यांचा बाप.
लेवीय 11:29 (MARVBSI)
जमिनीवर रांगणार्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावेत ते हे : मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातींचे सरडे,