सफन्या 2:1-3
सफन्या 2:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे निर्लज्ज राष्ट्रा, तुम्ही सर्वजण गोळा व्हा आणि एकत्र या. फर्मान सादर होण्या आधी आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी, परमेश्वराचा कोप तुमच्यावर येईल त्यापुर्वी, परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वी तुम्ही एकत्र या. पृथ्वीवरील सर्व नम्र लोकहो, जे तुम्ही परमेश्वराचे नियम पाळता, ते तुम्ही त्यास शोधा, धार्मिकता शोधा! नम्रता शोधा! नम्र होण्यास शिका. कदाचित परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही सुरक्षित रहाल.
सफन्या 2:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे निर्लज्ज राष्ट्रा एकत्र ये, स्वतःला एकवटून घे, फर्मानाचा प्रभाव सुरू होण्याआधी आणि तो दिवस वाऱ्याने उडालेल्या भुशासारखा उडून जाण्यापूर्वी, याहवेहचा भयंकर संताप तुझ्यावर कोसळण्यापूर्वी, याहवेहच्या भयानक क्रोधाचा दिवस, तुझ्यावर कोसळण्यापूर्वी एकत्र ये. या देशातील नम्रजन हो, याहवेहचा ध्यास करा, तुम्ही जे त्यांच्या आज्ञा पाळता. धार्मिकतेचा ध्यास करा, नम्रतेचा ध्यास करा; याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी कदाचित तुम्हाला आश्रयस्थान मिळेल.
सफन्या 2:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, ताळ्यावर ये; निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्वराचा क्रोधदिन तुमच्यावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या. देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणार्यांनो, त्याचा आश्रय करा, नीतिमत्ता व नम्रता ह्याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.