YouVersion लोगो
सर्च आयकॉन

तीत 3:9-11 - Compare All Versions

तीत 3:9-11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण मूर्खपणाचे वाद, वंशावळ, कलह आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत. तुमच्यामध्ये फुट पडणाऱ्या मनुष्यास एकदा व दोनदा बोध केल्यावर आपल्यापासून दूर ठेव. तू जाणतोस की, असा मनुष्य बहकलेला असतो व स्वतः पाप करीत राहिल्याने त्याच्याकडून त्याचा स्वतःचा न्याय होतो.

सामायिक करा
तीत 3 IRVMAR

तीत 3:9-11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु नियमशास्त्राबद्दल मूर्खवाद, वंशावळ्या व वादविवाद आणि भांडणे टाळा, कारण हे निरर्थक आणि निरुपयोगी आहे. तुमच्यामध्ये कोणी तट पाडत असेल, तर त्याला पहिला व दुसरा इशारा दिला जावा, नंतर त्याच्याशी संबंध ठेवू नये. असा मनुष्य बिघडलेला आहे आणि त्याने स्वतःला दोषी ठरविले असून तो पाप करतो, याची तू खात्री बाळग.

सामायिक करा
तीत 3 MRCV

तीत 3:9-11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्रा-विषयीची भांडणे, ह्यांपासून दूर राहा. कारण ती निरुपयोगी व व्यर्थ आहेत. तट पाडणार्‍या माणसाला एकदा-दोनदा बोध करून मग त्याला वर्ज्य कर; असला माणूस बिघडलेला आहे, आणि त्याने स्वत:च स्वत:ला दोषी ठरवले असून तो पाप करत राहतो, हे तुला ठाऊक आहे.

सामायिक करा
तीत 3 MARVBSI

तीत 3:9-11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयींची भांडणे, ह्यांपासून दूर राहा कारण ती अहितकारक व व्यर्थ आहेत. तट पाडणाऱ्या माणसाला निदान दोनदा इशारा दे आणि नंतर त्यांच्याशी संबंध ठेवू नको. असला माणूस विकृत आहे, हे तुला ठाऊक आहे आणि त्याची पापे त्याचा न्यायनिवाडा करतात.

सामायिक करा
तीत 3 MACLBSI