YouVersion लोगो
सर्च आयकॉन

तीत 2:4-15

तीत 2:4-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे. आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्‍या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्‍या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून, तू त्यांना बोध कर. तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता, आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्‍याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा. आणि दासांनी सर्व गोष्टींत त्यांच्या स्वामीच्या आज्ञेत रहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये; त्यांनी चोर्‍या करू नयेत तर सर्व गोष्टींत चांगला विश्वासूपणा दाखवावा; आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस, सर्व लोकात, त्यांनी शोभा आणावी; असा तू त्यांना बोध कर. कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे. आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी; आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत. तू या गोष्टी समजावून सांग, बोध कर आणि सर्व अधिकार पूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये.

सामायिक करा
तीत 2 वाचा

तीत 2:4-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

म्हणजे त्या तरुण स्त्रियांस त्यांच्या पतींवर आणि मुलांवर प्रीती करण्यास, आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल, म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच, तरुणांनी आत्मसंयमी व्हावे, म्हणून त्यांना प्रोत्साहित कर. जे चांगले ते करून, तू त्यांना प्रत्येक गोष्टींत कित्ता घालून दे. तुझ्या शिकविण्यात प्रामाणिकपणा, गांभीर्य दाखव. दोष लावता येणार नाही अशा सद्भाषणाने युक्त तुझी शिकवण असावी; यासाठी की जे तुला विरोध करतील, त्यांना आपल्याविषयी वाईट बोलण्यास जागाच नसल्यामुळे लाज वाटावी. दासांना असा बोध कर की त्यांनी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना उलट उत्तर देऊ नये; आणि त्यांनी चोरी करू नये, तर त्यांच्यावर भरवसा ठेवण्यास ते लायक आहेत असे दाखवावे. यासाठी की या सर्व गोष्टींत त्यांनी आपल्या तारणार्‍या परमेश्वराबद्दलच्या शिक्षणास शोभा आणावी. कारण आता सर्वांना तारण देणारी परमेश्वराची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की, आम्ही अभक्ती व ऐहिक वासनांना “नाही” म्हणून, आताच्या युगात आत्मसंयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे; आणि धन्य आशेची, म्हणजे येशू ख्रिस्त आपले महान परमेश्वर आणि तारणाऱ्यांचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहावी. त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले. अधिकाराने या सर्व विषयांचे शिक्षण देऊन लोकांना बोध आणि प्रोत्साहित कर. यात कोणीही तुला तुच्छ मानू नये.

सामायिक करा
तीत 2 वाचा

तीत 2:4-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवर्‍यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे; त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणार्‍या, मायाळू, आपापल्या नवर्‍याच्या अधीन राहणार्‍या, असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे म्हणून त्यांना बोध कर. सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे स्वतःला दाखव; शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण ह्यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे; ह्यासाठी की, विरोध करणार्‍याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. दासांनी आपल्या धन्यांच्या अधीन राहावे; त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये, त्यांना लुबाडू नये तर सर्व प्रकारे इमानेइतबारे वागावे, ह्यासाठी की, त्यांनी सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा बोध कर. कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे; ती आपल्याला असे शिकवते की, धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’ ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग.

सामायिक करा
तीत 2 वाचा

तीत 2:4-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलांबाळांवर प्रेम करावे, त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू व नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या, असे असावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे, म्हणून त्यांना बोध कर. सर्व गोष्टींविषयी चांगल्या वर्तणुकीचा आदर्श, असे स्वतःला सादर कर. तुझी शिकवण प्रामाणिक व गंभीर स्वरूपाची असू दे. टीका करता येणार नाही असे उचित शब्द वापर म्हणजे विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. दासांनी आपल्या धन्यांच्या आज्ञेत राहावे, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये, त्यांना लुबाडू नये, तर सर्व प्रकारे इमानेइतबारे वागावे, ह्यासाठी की, त्यांनी सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा त्यांना बोध कर. सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की, ज्या धन्य दिवसाची आम्ही आशेने प्रतीक्षा करतो म्हणजे आपला थोर देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे वैभव प्रकट होण्याच्या दिवसाची वाट पाहत आपण भक्तिहीनता व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व भक्तीने वागावे. आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक स्वतःकरिता शुद्ध करून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले. ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. त्यांच्यापैकी कोणीही तुला तुच्छ मानू नये.

सामायिक करा
तीत 2 वाचा