गीतरत्न 2:13-14
गीतरत्न 2:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे. आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत. ती सुगंध पसरीत आहे. अगे माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या. माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या खडकात लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुझे मुख पाहू दे. मला तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझा चेहरा खूप सुंदर आहे.
गीतरत्न 2:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अंजिराच्या झाडाची फळे लागली आहेत; आणि द्राक्षवेलींच्या फुलांचा सुगंध दरवळत आहे. ऊठ, ये, माझ्या प्रिये; माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये.” डोंगराच्या कपारीत, कड्यांच्या गुप्त जागी राहणारी माझी कबुतरीण, मला तुझे मुख पाहू दे, मला तुझा स्वर ऐकू दे; कारण तुझा स्वर गोड आणि तुझा चेहरा मनोहर आहे.
गीतरत्न 2:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत; द्राक्षीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे; माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये. अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे; कारण तुझा कंठ मधुर आहे; तुझे मुख रम्य आहे.