YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 8:21-24

रोमकरांस पत्र 8:21-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यासाठी की स्वतः सृष्टी विनाशाच्या दास्यत्वातून मोकळी होईल आणि परमेश्वराच्या मुलांना मिळणार्‍या स्वतंत्रेत व गौरवात सहभागी होईल. कारण आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण सृष्टी प्रसूती वेदनांच्या क्लेशांप्रमाणे आतापर्यंत कण्हत आहे. ज्या आपणाला आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे, ते आपणही कण्हत आहोत, आपण देखील त्या परमेश्वराची दत्तक मुले म्हणून आपल्या शरीराचा उद्धार होईल त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत, आणि या आशेमध्येच आपण तारण पावलो आहोत. जी आशा दृश्य आहे ती आशाच नव्हे. जे काही आहे त्याची आशा कोण धरेल?