रोमकरांस पत्र 6:11-14
रोमकरांस पत्र 6:11-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना. म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका. आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मरण पावलेल्यातून जिवंत झालेले असे देवाला समर्पण करा आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा. तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, पण कृपेखाली आणले गेला आहात.
रोमकरांस पत्र 6:11-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याप्रमाणे, आपण पापाला मरण पावलेले आणि ख्रिस्त येशूंद्वारे परमेश्वरासाठी जिवंत झालेले असे माना. तुम्ही वाईट वासनांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून तुमच्या मर्त्य शरीरावर पापाची सत्ता गाजवू देऊ नका. तुमच्या शरीराचा कोणताही अवयव पाप करण्यासाठी दुष्टपणाचे साधन म्हणून सादर करू नका, परंतु त्याऐवजी मरणातून जिवंत झाल्यासारखे परमेश्वराला सादर करा; आणि आपला प्रत्येक अवयव नीतिमत्वाची साधने होण्याकरिता त्याला सादर करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून येथून पुढे पाप तुम्हावर स्वामित्व चालविणार नाही.
रोमकरांस पत्र 6:11-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारे स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना. ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये; आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही.
रोमकरांस पत्र 6:11-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग तसे तुम्हीही स्वतःस ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना. म्हणून तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन होऊ नये ह्यासाठी पापाने तुमच्या मर्त्य शरीरावर राज्य करू नये. तुम्ही यापुढे तुमचे अवयव दुष्टपणाची साधने म्हणून वापरू नका, परंतु तुमचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून देवाला अर्पण करा कारण तुम्हाला मरणातून जीवनाकडे आणण्यात आले आहे. तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीत, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पापाने तुमच्यावर सत्ता चालविता कामा नये.