रोमकरांस पत्र 4:16
रोमकरांस पत्र 4:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे; ते ह्यासाठी की, नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही. पण अब्राहामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे.
रोमकरांस पत्र 4:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, अभिवचन विश्वासाच्याद्वारे कृपा म्हणून अब्राहामाच्या सर्व वंशजाला मिळते. जे केवळ नियमांच्या अधीन आहेत त्यांनाच नव्हे, तर ज्यांचा विश्वास अब्राहामाच्या विश्वासासारखा आहे त्या सर्वांना, कारण अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे.
रोमकरांस पत्र 4:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे; अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा पिता जो अब्राहाम त्याचा जो विश्वास होता, त्याला अनुसरून जे चालतात, त्यांनाही निश्चित व्हावे.
रोमकरांस पत्र 4:16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्या कारणामुळे ते अभिवचन कृपेवर आधारित असावे म्हणून ते श्रद्धेवर अवलंबून असते. अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहाम ह्याचा जो विश्वास होता, त्याच्या श्रद्धेत जे सहभागी होतात, त्यांनाही उपलब्ध व्हावे.