रोमकरांस पत्र 2:29 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 2:29 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु जो अंतरी यहूदी तो यहूदी होय; आणि लेखाप्रमाणे व्हायची ती सुंता नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुंता होय; अशाची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.
रोमकरांस पत्र 2:29 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.
रोमकरांस पत्र 2:29 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
किंबहुना जो अंतरी यहुदी तो खरा यहुदी होय. अंतःकरणाची सुंता ही खरी सुंता होय. अशी सुंता लेखी नियमशास्त्रानुसार नव्हे तर देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे होत असते. अशा व्यक्तीची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.
रोमकरांस पत्र 2:29 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तोच खरा यहूदी, जो मनाने यहूदी आहे आणि सुंता ही अंतःकरणाची सुंता आहे व ती आत्म्याद्वारे आहे, लेखी व्यवस्थेप्रमाणे नाही. अशा व्यक्तीची प्रशंसा इतर लोकांकडून नव्हे, तर परमेश्वरापासून होईल.