YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 2:14-15 - Compare All Versions

रोमकरांस पत्र 2:14-15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावत: करत असतात, तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही, तरी ते स्वत:च आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंत:करणात लिहिलेला आहे असे दाखवतात; त्यांच्याबरोबर त्यांची सदसद्विवेकबुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां-विषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.

रोमकरांस पत्र 2:14-15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतः स्वतःसाठी नियमशास्त्र होतात. आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकांवर आरोप करतात किंवा एकमेकांचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMAR

रोमकरांस पत्र 2:14-15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, असे यहुदीतर जेव्हा नियमशास्त्रात जे आहे, ते स्वभावतः करत असतात तेव्हा, त्यांच्याकडे नियमशास्त्र नसले तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे, असे ते दाखवतात, शिवाय त्यांची सदसद्विवेकबुद्धीही साक्ष देते कारण त्यांचे मन त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवते.

रोमकरांस पत्र 2:14-15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

निश्चितच, जेव्हा गैरयहूदी लोकांजवळ नियमशास्त्र नव्हते, तरी जे नियमशास्त्रात आहे ते नैसर्गिकरित्या पाळीत होते, त्यांच्याजवळ नियम नव्हते तरी ते स्वतः नियम असे झाले. ते प्रदर्शित करतात की नियम त्यांच्या अंतःकरणात लिहिलेले आहे; त्यांची विवेकबुद्धीच त्यांना साक्ष देते आणि त्यांचेच विचार त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवितात.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV