Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 15:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 15:8-9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्‍चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”

रोमकरांस पत्र 15:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘म्हणून मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन, आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’

रोमकरांस पत्र 15:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तसेच यहुदीतरांनीदेखील देवाच्या दयेबद्दल त्याचा गौरव करावा. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: यहुदीतरांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.

रोमकरांस पत्र 15:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

म्हणजे गैरयहूदी लोकांनी परमेश्वराच्या दयेमुळे त्यांचे गौरव करावे. असे लिहिले आहे: “यास्तव गैरयहूदी लोकांमध्ये मी तुमचे स्तवन करेन; व तुमच्या नावाचे गुणगान गाईन.”

सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 MRCV