रोमकरांस पत्र 15:8-9
रोमकरांस पत्र 15:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मी म्हणतो की, ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला; म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनांचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे, आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘म्हणून मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन, आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’
रोमकरांस पत्र 15:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण मी तुम्हाला सांगतो की, ख्रिस्त परमेश्वराचे सत्य प्रस्थापित करण्याकरिता यहूदीयांचे सेवक झाले आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेली अभिवचने पूर्ण करावी, म्हणजे गैरयहूदी लोकांनी परमेश्वराच्या दयेमुळे त्यांचे गौरव करावे. असे लिहिले आहे: “यास्तव गैरयहूदी लोकांमध्ये मी तुमचे स्तवन करेन; व तुमच्या नावाचे गुणगान गाईन.”
रोमकरांस पत्र 15:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”
रोमकरांस पत्र 15:8-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण मी तुम्हांला सांगतो, परमेश्वर एकनिष्ठ आहे, हे दाखविण्यासाठी व पूर्वजांस दिलेली अभिवचने पूर्ण करण्यासाठी ख्रिस्त यहुदी लोकांचा सेवक झाला. तसेच यहुदीतरांनीदेखील देवाच्या दयेबद्दल त्याचा गौरव करावा. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: यहुदीतरांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.