रोमकरांस पत्र 14:6-9
रोमकरांस पत्र 14:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तोसुध्दा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो. कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही. कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत. कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
रोमकरांस पत्र 14:6-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी एखादा दिवस विशेष पाळतो तो प्रभूसाठी पाळतो, आणि जो मांस खातो तो प्रभूसाठी खातो; कारण तो परमेश्वराचे आभार मानतो; जो वर्ज्य करतो तो प्रभूकरिता करतो आणि तोही परमेश्वराचे आभार मानतो. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. आपण जगतो ते प्रभूकरिता जगतो; आणि आपण मरतो ते प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो, तरी प्रभूचे आहोत. ख्रिस्त याचसाठी मृत्यू पावले व पुन्हा जिवंत झाले की त्यांनी मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
रोमकरांस पत्र 14:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो, [आणि जो पाळीत नाही तो प्रभूकरता पाळत नाही;] आणि जो खातो तो प्रभूकरता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो; जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त ह्यासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
रोमकरांस पत्र 14:6-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो; जो खातो तो प्रभूकरता खातो कारण तो देवाचे आभार मानतो आणि जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही आणि तोही देवाचे आभार मानतो. आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही. जर आपण जगतो, तर प्रभूकरता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो, म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्याने मेलेल्यांचा व जिवंताचाही प्रभू असावे.