रोमकरांस पत्र 14:11-12
रोमकरांस पत्र 14:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’ तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.
रोमकरांस पत्र 14:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण असे लिहिले आहे: “ ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’ ‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ ” तर मग आपल्यातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल.
रोमकरांस पत्र 14:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे, त्या अर्थी माझ्यापुढे प्रत्येक गुडघा टेकेल, व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील.” तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशेब देवाला देईल.
रोमकरांस पत्र 14:11-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: प्रभू म्हणतो, ‘ज्याअर्थी मी जिवंत आहे, त्याअर्थी माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघे टेकील व प्रत्येक जीभ मी देव आहे, हे कबूल करील.’ तर मग आपणातील प्रत्येक जणाला आपापल्यासंबंधी देवाला हिशेब द्यावा लागणार आहे.