रोमकरांस पत्र 13:1-3
रोमकरांस पत्र 13:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणवतील. कारण चांगल्या कामात अधिकार्यांची भीती नाही पण वाईट कामात असते; मग तुला अधीकाराऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल.
रोमकरांस पत्र 13:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रत्येकाने प्रशासकीय अधिकार्यांच्या अधीन असावे, कारण परमेश्वराने जो नेमून दिला नाही, असा अधिकारच नाही. जे अधिकारी आहेत, ते स्वतः परमेश्वराने नेमलेले आहेत. यास्तव, जो अधिकारी व्यवस्थेविरुद्ध बंड करतो, तो परमेश्वराने स्थापित केलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करीत असतो आणि जे असे करतात, ते स्वतःवर दंड ओढवून घेतील. जे योग्य गोष्टी करतात, त्यांना राज्यकर्त्यांची भीती वाटत नाही, परंतु जे अयोग्य करतात त्यांनाच त्याची भीती वाटते. जे अधिकारी आहेत त्यांच्या भयापासून मुक्त असावे, अशी तुमची इच्छा आहे काय? तर मग योग्य तेच करा, म्हणजे तो तुमची प्रशंसा करेल.
रोमकरांस पत्र 13:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकार्यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो, तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणांवर दंड ओढवून घेतील. कारण चांगल्या कामाला अधिकार्यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकार्याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल
रोमकरांस पत्र 13:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकारी आहेत, ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेच्या आड येतो आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील. चांगल्या वागणुकीसाठी अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर गैरवागणुकीसाठी असते. तेव्हा अधिकाऱ्याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुला मान्यता मिळेल.