रोमकरांस पत्र 11:29-32
रोमकरांस पत्र 11:29-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात. कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता पण आता इस्त्राएलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे. त्याचप्रमाणे आता तेही अवमान करीत आहेत; म्हणजे तुमच्यावरील दयेच्या द्वारे त्यांच्यावर दया केली जावी. कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे.
रोमकरांस पत्र 11:29-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण परमेश्वराचे पाचारण व कृपादाने अपरिवर्तनीय असतात. एकेकाळी तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणारे नव्हता, आता यहूदीयांच्या अवज्ञेचा परिणाम म्हणून तुम्हाला दया मिळाली आहे, आता परमेश्वराची जी दया तुमच्यावर झाली त्याचा परिणाम म्हणून, जे आज्ञा उल्लंघन करणारे झाले, त्यांना आता दया प्राप्त होईल. कारण सर्वांवर दया करावी म्हणून परमेश्वराने त्या सर्वांना आज्ञा मोडणार्यांसोबत बांधले आहे.
रोमकरांस पत्र 11:29-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुमच्यावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे.
रोमकरांस पत्र 11:29-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवाला पस्तावा होत नाही आणि तो कृपादान व पाचारण काढून परत घेत नाही. पूर्वी तुम्ही ग्रीक लोक देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला यहुदी लोकांच्या आज्ञाभंगांमुळे दया प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे तुमच्यावरील दयेमुळे त्यांनाही आता दया प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कैदेत ठेवले आहे.