रोमकरांस पत्र 11:12 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 11:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा र्हास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता कितीतरी अधिक होईल!
रोमकरांस पत्र 11:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, त्यांचा अपराध हे जर जगाचे धन झाले आणि त्यांचे कमी होणे हे जर परराष्ट्रीयांची धन झाले, तर त्यांचा भरणा होणे हे त्याहून किती अधिक होईल?
रोमकरांस पत्र 11:12 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता त्यांचा अपराध हा जर जगासाठी आशीर्वाद आणि त्यांचा ऱ्हास हा जर यहुदीतरांसाठी आशीर्वाद ठरला आहे, तर त्या सर्वांचा समावेश झाल्यास तो आशीर्वाद किती तरी अधिक महान होईल!
रोमकरांस पत्र 11:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या पापांचा परिणाम म्हणून जग आत्मिकरित्या धनवान झाले आणि त्यांचे नुकसान म्हणजे गैरयहूदीयांचे आत्मिक धन झाले, तर मग त्यांचे भरून येणे कितीतरी आत्मिक आशीर्वादाने धनयुक्त होईल!