रोमकरांस पत्र 10:16-17
रोमकरांस पत्र 10:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’ तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
रोमकरांस पत्र 10:16-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु शुभवार्ता सर्वच इस्राएल लोकांनी स्वीकारली नाही. यशायाह म्हणतो, “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?” तरीपण, संदेश ऐकल्यानेच विश्वास प्राप्त होतो, आणि ख्रिस्ताचा संदेश, वचन ऐकल्यामुळे प्राप्त होतो.
रोमकरांस पत्र 10:16-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, “हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?” ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे2 होते.
रोमकरांस पत्र 10:16-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तथापि शुभवर्तमान सर्वांनी स्वीकारले आहे असे नाही. यशया म्हणतो, ‘प्रभो, आम्ही ऐकलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे?’ ह्याप्रमाणे संदेश ऐकल्याने विश्वास मिळतो व संदेश ख्रिस्ताच्या शद्बाद्वारे प्राप्त होतो.