YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 10:12-15

रोमकरांस पत्र 10:12-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे, ‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’ मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्‍याशिवाय ते कसे ऐकतील? आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’

रोमकरांस पत्र 10:12-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यहूदी व गैरयहूदी यामध्ये फरक नाही; त्या सर्वांचा एकच प्रभू आहे आणि जे त्यांचा धावा करतात त्या सर्वांना ते विपुल आशीर्वाद देतात, परंतु, “जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.” ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर ते त्याचा धावा कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलेच नाही, तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवतील? आणि कोणी त्यांना संदेश सांगितलाच नाही, तर ते कसे ऐकतील? आणि कोणाला पाठविल्यावाचून ते संदेश कसा सांगतील? कारण असे लिखित आहे: “शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत!”

रोमकरांस पत्र 10:12-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो संपन्न आहे. कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणार्‍यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? “चांगल्या गोष्टींची (शांतीची) सुवार्ता सांगणार्‍यांचे चरण किती मनोरम आहेत!” असा शास्त्रलेख आहे.

रोमकरांस पत्र 10:12-15

रोमकरांस पत्र 10:12-15 MARVBSIरोमकरांस पत्र 10:12-15 MARVBSIरोमकरांस पत्र 10:12-15 MARVBSIरोमकरांस पत्र 10:12-15 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा