प्रकटी 7:9-10
प्रकटी 7:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या. ते मोठ्याने ओरडून म्हणत होतेः राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे.
प्रकटी 7:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतर मी पाहिले आणि सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यातील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते. ते प्रचंड आवाजात घोषणा करीत होते: “राजासनावर बसलेल्या आमच्या परमेश्वरापासून आणि कोकर्यापासून तारणप्राप्ती होत आहे.”
प्रकटी 7:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते : “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकर्याकडून, तारण आहे!”
प्रकटी 7:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्यानंतर शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या घेतलेले प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक आणि भाषा बोलणारे यांचे असंख्य लोक राजासनासमोर व कोकरासमोर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते उच्च स्वराने म्हणत होते, “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडे व कोकराकडे तारण आहे.”