YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 7:1-4 - Compare All Versions

प्रकटी 7:1-4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ह्यानंतर मी चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनांवर’ उभे राहिलेले पाहिले, ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे ‘चार वारे’ अडवून धरत होते. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, “आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या ‘कपाळांवर’ आम्ही ‘शिक्का मारीपर्यंत’ पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.” ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.

सामायिक करा
प्रकटी 7 MARVBSI

प्रकटी 7:1-4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनावर उभे राहीलेले पाहीले, त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये. मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “आमच्या देवाचे दास यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका.” ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशातील एकशे चव्वेचाळीस हजांरावर शिक्का मारण्यात आला.

सामायिक करा
प्रकटी 7 IRVMAR

प्रकटी 7:1-4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ह्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोपऱ्यांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे चार वारे अडवून धरत होते. मी आणखी एक देवदूत पूर्व दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते, त्यांना तो ओरडून म्हणाला, “आमच्या देवाचे जे दास आहेत, त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.” ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्त्राएली लोकांच्या बारा वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.

सामायिक करा
प्रकटी 7 MACLBSI

प्रकटी 7:1-4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यानंतर पृथ्वीच्या चारही कोपर्‍यांवर चार देवदूत उभे राहिलेले मी पाहिले. पृथ्वीवरील भूमी, समुद्र किंवा कोणताही वृक्ष, यावर वाहू नये म्हणून ते त्या चारही वार्‍यांना थोपवून धरीत होते. मग दुसरा देवदूत पूर्वेच्या दिशेने हातात जिवंत परमेश्वराचा शिक्का घेऊन येताना मी पाहिला. पृथ्वीला व समुद्राला इजा करण्याचे काम ज्या चार देवदूतांवर सोपविले होते, त्या चार देवदूतांना तो ओरडून म्हणाला, “आम्ही परमेश्वराच्या सेवकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का मारीपर्यंत पृथ्वी, समुद्र किंवा वृक्ष यांना काहीही इजा करू नका.” ज्या लोकांवर हा शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली: ते इस्राएलच्या सर्व बारा वंशांमधून 1,44,000 लोक होते.

सामायिक करा
प्रकटी 7 MRCV