प्रकटी 3:14-16
प्रकटी 3:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लावदीकिया येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आमेन, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत. मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते. पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.
प्रकटी 3:14-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“लावदिकीया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे आमेन आहेत, विश्वासू व खरे साक्षी आणि परमेश्वराच्या सृष्टीचे शासक आहेत, ते असे म्हणतात. तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. तुम्ही थंड नाही व उष्ण नाही. तुम्ही थंड किंवा उष्ण असता तर बरे झाले असते! पण तुम्ही कोमट आहात, म्हणजे उष्ण नाही आणि थंडही नाही; म्हणून मी तुम्हाला माझ्या मुखातून बाहेर ओकून टाकीन.
प्रकटी 3:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो आमेन, जो ‘विश्वसनीय’ व खरा ‘साक्षी’, जो देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’ तो असे म्हणतो : तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.
प्रकटी 3:14-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लावदिकीया येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षीदार जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण. तो असे म्हणतो - तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू थंड नाहीस व उष्ण नाहीस. तू थंड किंवा उष्ण असतास तर बरे झाले असते! पण तू कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस किंवा थंड नाहीस. म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे!