प्रकटी 21:22-27
प्रकटी 21:22-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत. आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती; कारण देवाचे तेज तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे, राष्ट्रे तिच्या प्रकाशात चालतील; आणि पृथ्वीचे राजे आपले वैभव तिच्यात आणतील. तिच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत; आणि तेथे रात्र होणारच नाही. त्या राष्ट्रांकडून वैभव आणि मान तिच्यात आणतील; तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य, कोणत्याही प्रकारे प्रवेश करणार नाही पण कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच प्रवेश करता येईल.
प्रकटी 21:22-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नगरीत कुठे मंदिर दृष्टीस पडत नव्हते, कारण सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आणि कोकरा हेच तिथे मंदिर होते. नगरीला प्रकाश देण्यासाठी सूर्यचंद्राची गरज नाही, कारण परमेश्वराचे गौरव तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे. राष्ट्रे त्यांच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील. तिच्या वेशी दिवसा बंद होत नाहीत; तिथे रात्र नाहीच. सर्व राष्ट्रांचे वैभव आणि प्रतिष्ठा, नगरीमध्ये आणण्यात येईल. मात्र त्या नगरीत कोणतीही अपवित्र गोष्ट, लज्जास्पद किंवा असत्य आचरण करणाऱ्यांचा प्रवेश होणार नाही. परंतु ज्यांची नावे कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच या नगरीत प्रवेश करतील.
प्रकटी 21:22-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे. ‘राष्ट्रे’1 तिच्या ‘प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे’ आपले ‘वैभव’ व सन्मान तिच्यात आणतात. तिच्या ‘वेशी दिवसा बंद होणारच नाहीत; रात्र’ तर तेथे नाहीच. ‘राष्ट्राचे वैभव’ व प्रतिष्ठा तिच्यात आणतील; ‘तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी’ आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा ‘प्रवेश होणारच नाही’ तर कोकर्याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा’ मात्र होईल.
प्रकटी 21:22-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या नगरीत माझ्या पाहण्यात मंदिर आले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरू हेच तिचे मंदिर होय. नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नव्हती, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली होती आणि कोकरू हेच तिचा दीप. राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील. तिच्या वेशी दिवसा बंद होणार नाहीत, रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्रांचे वैभव व संपत्ती तिच्यात आणतील. मात्र त्या नगरीत कोणत्याही निषिद्ध गोष्टी, अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा प्रवेश होणार नाही. ज्यांची नावे कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच ह्या नगरीत प्रवेश करतील.