प्रकटी 20:13-14
प्रकटी 20:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
समुद्राने आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले आणि मृत्यू व मृतलोक ह्यांनीही आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले; आणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. आणि मरण व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण.
प्रकटी 20:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे लोक समुद्रात मरण पावले होते, त्यांना समुद्रांनी परत दिले. पृथ्वी व अधोलोक यांनीही आपल्यातील मृतांना बाहेर सोडले. त्या प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला. मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आली. अग्नीचे सरोवर म्हणजेच दुसरे मरण होय.
प्रकटी 20:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले; आणि ‘ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे’ प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.
प्रकटी 20:13-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यानंतर समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर टाकले. मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्या हाती असलेल्या मृतांना बाहेर सोडले. आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मृत्यू व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.