प्रकटी 2:1-2 - Compare All Versions
प्रकटी 2:1-2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.
प्रकटी 2:1-2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे आपल्या उजव्या हातात सात तारे धरतात व जे सोन्याच्या सात समयांमध्ये चालतात, ते असे म्हणतात. तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मला ठाऊक आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला ठाऊक आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे.
प्रकटी 2:1-2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो, ‘तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत; तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केलीस; आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले.
प्रकटी 2:1-2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
इफिस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो व जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो - तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची पारख केल्यामुळे ते खोटे आहेत, असे तुला दिसून आले.