प्रकटी 12:3-4
प्रकटी 12:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले ते हे : पाहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला सात डोकी व ‘दहा शिंगे’ होती, आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. त्याच्या शेपटाने ‘आकाशातील तार्यांपैकी एक तृतीयांश तारे’ ओढून काढून ते ‘पृथ्वीवर पाडले’; ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणार्या स्त्रीपुढे उभा राहिला होता.
प्रकटी 12:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील तिसरा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले; आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला.
प्रकटी 12:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तोच स्वर्गामध्ये दुसरे चिन्ह दिसले: एकाएकी सात डोकी आणि दहा शिंगे असलेला एक प्रचंड अग्निवर्ण अजगर दृश्यमान झाला. त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. त्याने आपल्या शेपटाने एकतृतीयांश तारे ओढून घेतले आणि त्यांना पृथ्वीवर खाली लोटून दिले. मग तो अजगर, त्या स्त्रीचे मूल जन्मल्या बरोबर ते खाऊन टाकावे, या उद्देशाने तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.
प्रकटी 12:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले ते हे : पाहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला सात डोकी व ‘दहा शिंगे’ होती, आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. त्याच्या शेपटाने ‘आकाशातील तार्यांपैकी एक तृतीयांश तारे’ ओढून काढून ते ‘पृथ्वीवर पाडले’; ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणार्या स्त्रीपुढे उभा राहिला होता.
प्रकटी 12:3-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
स्वर्गात दुसरे एक रहस्यमय दृश्य दिसले ते हे: पाहा, एक मोठा तांबूस अजगर दिसला, त्याला सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर सात मुकुट होते. त्याच्या शेपटीने त्याने आकाशातील ताऱ्यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढले व ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला.