प्रकटी 1:19-20
प्रकटी 1:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस, ज्या घडत आहेत आणि ज्या यानंतर घडणार आहेत त्याही लिही. जे सात तारे तू माझ्या हातात पाहिलेस आणि ज्या सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे की सात समया या सात मंडळ्या आहेत आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.”
प्रकटी 1:19-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तर तू जे पाहिले, जे आता आहे आणि यानंतर घडणार आहे, ते सर्व लिहून ठेव. तू माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या सात तार्यांचे व सोन्याच्या सात समयांचे रहस्य हे आहे: हे सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे देवदूत आणि सोन्याच्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आहेत.”
प्रकटी 1:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून जे तू पाहिले, जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव; जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे, आणि सोन्याच्या त्या सात समयांचे ‘गूज’ हे आहे; ते सात तारे हे सात मंडळ्यांचे दूत आहेत; आणि सात समया ज्या तू पाहिल्या त्या सात मंडळ्या आहेत.
प्रकटी 1:19-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून जे तू पाहिले म्हणजेच जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहतोस त्यांचे आणि सोन्याच्या त्या सात समयांचे गूज हे आहे:ते सात तारे हे सात ख्रिस्तमंडळ्यांचे दूत आहेत आणि सात समया ह्या सात ख्रिस्तमंडळ्या आहेत.”