YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 99:1-3 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 99:1-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो. सियोनात परमेश्वर महान आहे; तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे. ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे.

स्तोत्रसंहिता 99:1-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याहवेह राज्य करतात, राष्ट्रे थरथर कापोत; ते करुबांमध्ये सिंहासनावर आरूढ झाले आहेत; सर्व पृथ्वी कंपित होवो. अतिमहान होत सीयोनातील याहवेह; ते सर्व राष्ट्रात परमोच्च असे आहेत. राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत— याहवेह पवित्र आहेत.

स्तोत्रसंहिता 99:1-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परमेश्वर राज्य करतो; लोक कंपित होवोत; तो करूबांवर अधिष्ठित आहे; पृथ्वी थरथर कापो. परमेश्वर सीयोनेत थोर आहे; तो सर्व लोकांहून परम थोर आहे. ते तुझे थोर व भययोग्य नाव स्तवोत; पवित्र तोच आहे.