YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 9:1-6

स्तोत्रसंहिता 9:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन; मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन. तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन. माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात. कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे. आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस; तू दुष्टाचा नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे. जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.

स्तोत्रसंहिता 9:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन; मी तुमच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन. मी आनंदित होईन आणि तुमच्यामध्ये हर्ष करेन; हे सर्वोच्च प्रभू, मी तुमच्या नावाची स्तुतिस्तोत्रे गाईन. माझे शत्रू मागे वळतात; ते तुमच्यासमोर अडखळतात आणि नष्ट होतात. कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे, तुम्ही नीतिमान न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसलेले आहात. तुम्ही राष्ट्रांना धमकाविले आहे आणि दुष्टांना नष्ट केले आहे; त्यांची नावे तुम्ही कायमची पुसून टाकली आहेत. माझे शत्रू कायमचे नष्ट झाले आहेत, तुम्ही त्यांची नगरे उद्ध्वस्त केली; त्यांची आठवणसुद्धा नाहीशी झाली आहे.

स्तोत्रसंहिता 9:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन; तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन. मी तुझ्या ठायी हर्ष व उल्लास पावेन; हे परात्परा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन. माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात; कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस; तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस. तू राष्ट्रांना धमकावले आहेस; दुर्जनांचा तू नाश केला आहेस; तू त्यांचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस. वैर्‍यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे.

स्तोत्रसंहिता 9:1-6

स्तोत्रसंहिता 9:1-6 MARVBSIस्तोत्रसंहिता 9:1-6 MARVBSIस्तोत्रसंहिता 9:1-6 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा