YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 86:11-13 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 86:11-13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव, मग मी तुझ्या सत्यात चालेन. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. हे प्रभू, माझ्या देवा, मी अगदी आपल्या मनापासून तुझी स्तुती करीन; मी सर्वकाळ तुझ्या नावाचे गौरव करीन. कारण माझ्यावर तुझी महान दया आहे; तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस.

स्तोत्रसंहिता 86:11-13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे याहवेह, तुमचे मार्ग मला शिकवा, म्हणजे तुमच्या विश्वासूपणावर मी भरवसा ठेवेन; मला एकचित्त हृदय प्रदान करा, म्हणजे मी तुमच्या नावाचे भय बाळगेन. माझ्या प्रभू परमेश्वरा, मी माझ्या संपूर्ण हृदयाने तुमचे स्तवन करेन; मी तुमच्या नामाला सदासर्वकाळ गौरव देईन. कारण माझ्यावर तुम्ही अत्यंत प्रीती करता; अधोलोकाच्या तळापासून तुम्ही माझे प्राण सोडविले आहेत.

स्तोत्रसंहिता 86:11-13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगान गाईन, तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णन करीन. कारण माझ्यावर तुझी दया फार आहे; अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धरला आहेस.