स्तोत्रसंहिता 8:5-9
स्तोत्रसंहिता 8:5-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस. आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे. तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस. तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस. सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा. आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व. हे परमेश्वरा, आमच्या देवा, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे!
स्तोत्रसंहिता 8:5-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे. तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या. सर्व कळप व गुरे, आणि वनपशू. आकाशातील पक्षी, आणि समुद्रातील मासे, सागरात संचार करणारे सर्व प्राणी. याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे!
स्तोत्रसंहिता 8:5-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू त्याला देवापेक्षा1 किंचित कमी असे केले आहेस; त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहेस, तू सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले आहेस. शेरडेमेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशू; आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे!