स्तोत्रसंहिता 73:1-5
स्तोत्रसंहिता 73:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे, जे अंतःकरणाने शुद्ध आहेत. पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते; माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते. कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला. कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात. दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात; ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात.
स्तोत्रसंहिता 73:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
निश्चितच परमेश्वर इस्राएलसाठी, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, त्यांच्यासाठी चांगले आहेत. माझ्याविषयी म्हणाल, तर माझे पाय अडखळू लागले होते; माझी पावले घसरण्याच्या बेतास आली होती. कारण दुष्टांची समृद्धी पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो. होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात. इतर मनुष्यांसारखी त्यांच्यावर सहसा संकटे येत नाहीत आणि इतरांप्रमाणे आजाराने पीडलेही जात नाहीत.
स्तोत्रसंहिता 73:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देव इस्राएलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते; माझी पावले बहुतेक घसरणार होती. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्यांना मरणयातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात; इतर मनुष्यांप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात