स्तोत्रसंहिता 71:15-18
स्तोत्रसंहिता 71:15-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे आणि तारणाविषयी सांगत राहील, जरी मला ते समजले नाही. प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन; मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन. हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे. खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे, तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत, हे देवा, मला सोडू नको.
स्तोत्रसंहिता 71:15-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जरी मला त्यांचे वर्णन करण्याची क्षमता नाही तरी दिवसभर माझे मुख तुमच्या न्यायीपणाच्या— आणि तारणाच्या कृत्यांबद्दल घोषणा करेल. मी येईन आणि प्रभू याहवेहच्या महान कार्याची घोषणा करेन; मी तुमच्या, केवळ तुमच्याच, नीतियुक्त कृत्यांची घोषणा करेन. परमेश्वरा, तारुण्यापासून तुम्ही मला शिकवीत आलेले आहात, आणि आजपर्यंत मी तुमच्या अद्भुतकृत्यांना जाहीर करीत आहे. आता माझे केस पांढरे झालेले असताना आणि मी वयस्कर झालो असताना, परमेश्वरा, माझा त्याग करू नका; तुमच्या सर्व सामर्थ्याचे वर्णन नवीन पिढीला आणि त्यांच्या मुलांना देखील सांगण्यासाठी तुम्ही मला अवधी द्या.
स्तोत्रसंहिता 71:15-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील; त्यांची संख्या मला कळत नाही. प्रभू परमेश्वराच्या महत्कृत्यांचे मी वर्णन करत येईन; तुझ्या, केवळ तुझ्याच, नीतिमत्त्वाचे मी निवेदन करीन. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णन केली आहेत. मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.