स्तोत्रसंहिता 68:4-5
स्तोत्रसंहिता 68:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा. तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 68 वाचास्तोत्रसंहिता 68:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या नावाचे स्तवन करा, जे मेघांवर स्वार होतात, त्यांची महिमा करा; त्यांचे नाव याहवेह आहे—त्यांच्या समक्षतेत हर्ष करा. परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत, ते आपल्या पवित्र निवासस्थानी आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 68 वाचास्तोत्रसंहिता 68:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश आहे, त्याच्यापुढे आनंदोत्सव करा. पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 68 वाचा